सावेडी कचरा डेपो पेटला ; अग्निशमन गाडी पडली बंद


DNALive24 : वेब टीम, अहमदनगर
महापालिकेच्या तपोवन रोडवरील सावेडी कचरा डेपोतील कचर्‍याला सोमवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु अग्निशमन ची एक गाडी बंद पडली. त्यामुळे अग्निशमन च्या एका गाडीवरच आग विझवावी लागली. उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. अग्निशमन ची गाडी बंद पडल्याने मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

शहराचा कचरा सावेडी डेपोत आणून टाकला जात आहे. डेपोच्या आवारात साचलेल्या कचर्‍याला सोमवारी सायंकाळी आग लागली. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. आग लागल्यामुळे परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते.

नगरसेवक संपत बारस्कर, सागर बोरुडे, सतीश बारस्कर,
बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. घनकचरा व्यवस्थापन विभाग व महापालिका प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी न फिरकल्याने नगरसेवक  संंपत बारस्कर, सतीश बारस्कर यांनी नाराजी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post