सोनिया गांधींची पुन्हा काँग्रेस संसदीय दलाच्या प्रमुखपदी निवड


DNALive24 : नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक संसदेच्या सभागृहात पार पडली. त्यामध्ये पुन्हा काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनाच निवडण्यात आले आहे. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसची संसदीय दलाची बैठक दिल्लीमध्ये 52 खासदारांच्या उपस्थितीत पार पडली. संसदेच्या आगामी अधिवेशनासाठी काँग्रेसची रणनिती या बैठकीत ठरवण्यात आली आहे.

बैठकीत सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतीसुमने उधळली. राहुल दुरदृष्टी असलेला नेता आहे. तो पक्षाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, असं त्या म्हणाल्या आहेत.

राहुल गांधींनीही यावेळी खासदारांशी संवाद साधला. त्यांनी नेत्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. ५२ खासदार असलेल्या काँग्रेसला विरोधीपक्षनेते पदावरही दावा सांगता येणार नाही. विरोधीपक्षनेते पदासाठी ५४ खासदारांची आवश्यकता असते. त्यामुळे सरकार सांगेल त्याला संधी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post