रोहितची अवस्था पार्थपेक्षाही वाईट करणार : खा. सुजय विखे


DNALive24 : वेब न्यूज, अहमदनगर
एकीकडे शरद पवारांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत असतांना, दुसरीकडे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांनी पुन्हा एकदा पवारांना डिवचले आहे. एका सत्कार समारंभात बोलतांना त्यांनी 'रोहितची अवस्था पार्थपेक्षाही वाईट करू', असे म्हणत पुन्हा विखे विरुद्ध पवार असा संघर्ष रंगणार असल्याचे संकेत दिले.
निवडणुकीत विजयी झाल्यानंतर, कर्जत येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच पालकमंत्र्यांना धीरही दिला.

'पालकमंत्री शिंदे साहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. कर्जत-जामखेडमधून लढू इच्छिणाऱ्या रोहित पवारांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू'. ती जबाबदारी माझी आहे. तुमच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झाली नाही. मात्र, इतिहास घडवू, सर्वच कामे बोलून होत नाहीत. आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारख गप्प बसून काम दाखवू', असे सुजय विखे यांनी म्हंटले.

सर्वांनीच प्रामाणिकपणे काम केल्याने मी उच्चांकी मतांनी निवडून आलो. आता सर्वच ठिकाणी भाजपचे कमळ फुलवायचे आहे असे आश्वासनही त्यांनी दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post