मी रोहित पवार यांचे नावही घेतले नाही : सुजय विखे


DNALive24 : अहमदनगर
कर्जत येथे झालेल्या सभेत मी रोहित पवार यांचे नावही घेतले नाही. पवार कुटुंबावर कोणतीही टीका केलेली नाही', असा खुलासा नगरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माध्यमात केला आहे. खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल डॉ. सुजय  यांचा काल कर्जत येथे  सत्कार झाला. या कार्यक्रमात रोहित पवारांची अवस्थ पार्थ पवारांपेक्षा वाईट करू, असे वक्तव्य सुजय यांनी केल्याचे वृत्त माध्यमातून प्रसिद्ध झाले होते.

यासंदर्भाने सुजय विखे यांनी आज खुलासा केला आहे. कर्जत येथील कार्यक्रमात पालकमंत्री राम शिंदे यांना मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आणण्यासंदर्भात मी भाष्य केले होते. त्या दरम्यान मी रोहित पवार व पार्थ पवार यांचे साधे नावही घेतले नाही, असे सुजय यांनी सांगितले आहे. दरम्यान, 'रोहित पवारांची अवस्था पार्थ पवारांपेक्षा वाईट करू' असे विधान भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी केल्याचे स्थनिक पत्रकार सांगतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post