खर्चातही खासदार डॉ.सुजय विखेंची आघाडी ; लोकसभेसाठी केला ६४ लाख खर्च


वेब टीम : अहमदनगर
शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवारानी प्रशासना समोर अंतिम खर्च सादर केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांनी सुमारे ६४लाख रुपयाचा खर्च त्यांनी खासदारकीसाठी केला आहे. त्याच्या विरोधात असलेले आमदार संग्राम जगताप यांनी 61लाख रूपयाचा खर्च सादर केला आहे. तर शिर्डीचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे व कॉग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे याचा खर्च प्रत्येकी 59 लाख खर्च सादर केला आहे.

अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी नगर मतदारसंघातून 19 तर शिर्डी मतदार संघातून 20 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीतील खर्च उमेदवारांनी अंतिम स्वरूपात प्रशासनासमोर सादर केला. दोन्ही मतदार संघातील उमेदवारांनी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील खर्च प्रशासनासमोर सादर केला होता. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत अंतिम खर्च सादर केला नव्हता. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना 23 जून पर्यंत खर्च सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.

अहमदनगर मतदार संघात भाजपचे सुजय विखे यांचा खर्च सर्वधिक 64 लाख 49 हजार 332 झाला आहे. त्याचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी 61 लाख 8 हजार 138 रुपयेचा खर्च नोंदवला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates