तनुश्रीने पुन्हा साधला नानांवर निशाणा


वेब टीम : मुंबई
अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून अभिनेते नाना पाटेकर यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. याप्रकरणाला मिळालेल्या वळणामुळे संतप्त झालेल्या तनुश्रीने पोलिसांना भ्रष्ट म्हणत पुन्हा एकदा नानांवर निशाना साधला. आपल्या एका मुलाखतीमध्ये तिने नाना यांच्या नाम फाऊंडेशन या संस्थेवर आरोप करीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. नाम फाऊंडेशनद्वारा शेतकर्‍यांसाठी जमा केलेले पैसे त्यांना न मिळाल्याचा धक्कादायक खुलासा तनुश्रीने केला.

शेतकर्‍यांच्या नावावर करोडो रुपये गोळा करून  त्यात मोठा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. मी टू प्रकरणी पोलिसांना कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, याचा अर्थ असा नाही की ते दोषी नाहीत. कोणतीही क्लिन चीट त्यांना या सर्वांपासून वाचवू शकणार नाही. त्यांनी स्वत:ला कितीही निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, कायदा विकत घेण्याचा प्रयत्न केला किंवा प्रतिमा चांगली राहण्यासाठी  प्रयत्न केला. तरी सत्य लवकरच उघड होईल, असे तनुश्री म्हणाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post