World Cup 2019 : बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर सनसनाटी विजय


DNALive24 : वेब टीम, लंडन
बांगलादेशने विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी सनसनाटी विजय साजरा केला. तर दक्षिण आफ्रिकेला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेसमोर 331 धावांचं मोठे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला आठ बाद 309 धावांचीच मजल मारता आली.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसीची 62 धावांची खेळी संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. आफ्रिकेकडून एडन मार्क्रम 45, ड्युमिनी 45, रॅसी ड्यूसन 41 धावा केल्या. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रेहमाननं तीन फलंदाजांना माघारी धाडले. तर सैफुद्दीनने दोन विकेट्स घेऊन बांगलादेशच्या विजयात मोठं योगदान दिले.

त्याआधी, मुशफिकुर रहीम आणि शाकिब अल हसनच्या अर्धशतकांमुळे बांगलादेशने यंदाच्या विश्वचषक मोहिमेची दमदार सुरुवात केली आहे. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा बाद 330 धावांचा डोंगर उभारला. सलामीच्या सौम्या सरकार आणि तमिम इक्बालने बांगलादेशला 60 धावांची सलामी दिली. त्यानंतर मुशफिकुर रहीम आणि शाकिबनं खेळाची सूत्रे आपल्या हातात घेत दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post