DNALive24 : वेब टीम, इंग्लंड इंग्लंडमधल्या वर्ल्ड कपमध्ये भारत खेळत असलेल्या सामन्यांच्या तिकिटांचे भाव गगनाला भिडत आहेत. इंग्लंडबरोबर ...
DNALive24 : वेब टीम, इंग्लंड
इंग्लंडमधल्या वर्ल्ड कपमध्ये भारत खेळत असलेल्या सामन्यांच्या तिकिटांचे भाव गगनाला भिडत आहेत. इंग्लंडबरोबर एजबस्टन येथे जून ३० रोजी होणाऱ्या सामन्याचे तिकिट आयसीसी व त्यांची तिकिटविक्रीतील भागिदार कंपनी तिकिट मास्टर आधी २०,६६८ रुपयांना विकत होती. आता मात्र याच प्लॅटिनम तिकिटाचा भाव ट्रॅवल एजंटच्या माध्यमातून तब्बल ८७,५१० रुपये इतका वधारला आहे.
तर लॉर्ड्सवर १४ जुलै रोजी खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड कपच्या फायनलच्या तिकिटांचे दर तर त्याहूनही वेगाने अस्मानाला भिडत आहेत. सिल्वर व ब्राँझ श्रेणीतील लॉर्डसची तिकिटं आधी अनुक्रमे १७,१५० रुपये व ८,३३५ रुपयांना उपलब्ध होती. आता याच तिकिटांचे दर तब्बल १.५ लाख रुपये व १.३१ लाख रुपये इतके फुगले आहेत. आयसीसीच्या मूळ नोंदींनुसार भारत फायनलमध्ये गेला तरी तिकिटाचा दर ३४,७४० रुपये आहे. विशेष म्हणजे हे ब्लॅकचे दर नसून आयसीसीचे अधिकृत ट्रॅवेल एजंट असलेल्या फॅनाटिक स्पोर्टस या कोलकातास्थित कंपनीचे हे दर आहेत.
भारत पाकिस्तानमध्ये रंगणाऱ्या मँचेस्टर येथील सामन्यासाठी फॅनाटिकनं १.६६ लाख रूपयांचं प्लॅटिनम कम गाला तिकिट ऑफर केलं असून यात मँचेस्टर सिटी सुइटमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे या ट्रॅवल एजंटच्या माध्यमातून उपलब्ध असेलल्या तिकिटांच्या दरांचा विचार केला तर फायनलपेक्षा भारत – पात सामन्याचं तिकिट महाग असल्याचं दिसत आहे.