हवेत गोळीबार करून महिलेला लुटण्याचा प्रयत्न


वेब टीम : अहमदनगर
कोपरगाव येथील धारणगावर रस्त्यावरुन पैसे घेऊन जात असणा-या महिलेला रस्त्यामध्ये अडवून हल्लेखोराने हवेत गोळीबार करण्याची घटना बुधवारी (दि.17) रात्री घडली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.


याबाबत पोलिसांनी सांगितले की, धारणगाव रोडवर माला धोगडी यांचे किशोर वाईन्स हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री त्यांनी दुकान बंद करुन दिवसभराची जमा झालेली रक्कम बरोबर घेऊन त्या दुचाकीवरुन घरी निघाल्या. त्या खुले नाटयगृहजवळील रस्त्यावर आल्या असताना मोटारसायकलवरुन दोघे जण आले व त्यांनी धोगडी यांना अडविले. त्यांना धाक दाखविण्यासाठी त्यांच्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. मात्र, त्याचा उलटाच परिणाम झाला. रात्रीच्या शांत वातावरणात गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासचे लोक धावत त्यांच्या दिशेने येऊ लागले. लोकांना येताना पाहून दोघा हल्लेखोरांनी पळ काढला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post