बंगालात हिंसाचार थांबेना, खासदराच्या घरावरच फेकला बॉम्ब


वेब टीम : कोलकाता
लोकसभा निवडणूक संपून बरेच दिवस झाले आहेत. मात्र पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार थांबता थांबेना अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत बैरकपूरचे भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्‍या घरावर बॉम्‍ब फेकण्‍यात आला आहे. तसेच गोळीबार देखील करण्‍यात आला आहे.

ही घटना बुधवारी (ता.२४) रात्री उत्तर २४ परगना जिल्‍ह्‍यात जगतदल पोलिस ठाण्‍याच्‍या सीमेअंतर्गत घडली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

खासदार अर्जुन सिंह यांचा पुतन्‍या सौरभ सिंह यांनी या घटनेसाठी तृणमूल कांग्रेसला जबाबदार ठरवले आहे. त्‍यांच्‍या मते हा आत्‍मघातकी हल्‍ला होता. सौरभ यांनी घराच्‍याबाहेर बर्‍याच गोळ्‍या सापडल्‍याचे सांगितले. या हल्‍ल्‍यानंतर खासदार अर्जुन सिंह यांच्‍या घराबाहेर बंदोबस्‍त वाढवण्‍यात आला आहे.

सौरभ सिंह यांच्‍या तक्रारीनंतर अर्जुन सिंह यांच्‍या घराबाहेर कडक पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. यासोबतच आरएफची फौज तैनात करण्‍यात आली आहे. बैरकपूर पोलिस ठाण्‍यातील मनोज कुमार वर्मा यांनी घटनास्‍थळी भेट देत जिवंत हा बॉम्‍ब आहे की नाही याची तपासणी केली.

सौरभ सिंह यांचे मत आहे की, बुधवारी रात्री मी जेव्‍हा मजदूर भवनात पोहोचलो तेव्‍हा अचानक घरावर बॉम्‍ब फेकण्‍यात आला. घराच्‍याबाहेर येऊन पाहिले तर त्‍यांना तृणमूल नेते प्रमोद सिंह, संजय सिंह, नवनीत सिंह, रंजीत सिंह आणि हरगोविंद सिंह यांनी पाहिले. त्‍यांच्‍याकडे अवैध हत्‍यारे यासोबतच रायफल देखील होती.

तृणमूलच्‍या नेत्‍यांनी सात ते आठ गोळ्‍या झाडल्‍याचा भाजप नेत्‍यांकडून दावा करण्‍यात आला आहे. आम्‍हाला मारण्‍याच्‍या हेतूनेच ते आल्‍याचा दावा देखील त्‍यांच्‍यकडून करण्‍यात आला आहे. लोकसभा निवडणुकीआधी अर्जुन सिंह यांनी भाजपात प्रवेश केला होता. तसेच त्‍यांच्‍यासोबत तृणमूल काही नेत्‍यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला होता. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post