ठाकरेंचा पंढरपूर दौरा रद्द, फडणवीस आज सहकुटुंब पंढरपुरात


वेब टीम : पंढरपूर
आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा करत असतात. गतवर्षी मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येता आले नव्हते. यावर्षी शुक्रवारी (12 जुलै) आषाढी एकादशी येत असून, यानिमित्तच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक उपस्थित राहणार आहेत.

आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील येणार असल्याची चर्चा होती मात्र ठाकरे यांचा दौरा रद्द झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा डझन मंत्री आज पंढरपुरात येत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब सायंकाळी पंढरपुरात दाखल होत आहेत. पहाटे दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होईल. यानंतर मराठा संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post