विधानसभेसाठी २९ जुलैपासून काँग्रेसच्या मुलाखती


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असणा-या ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे अर्ज केले आहेत. त्यांच्या मुलाखती २९, ३०, ३१ जुलै रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत.

दरम्यान विधानसभेच्या दृष्टीने राज्यातील ६० नेत्यांना २७ व् २८ रोजी पुणे येथे विशेष प्रशिक्षण आयोजित केले आहे,

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्यांच्या जिल्हा मुख्यालयी २९, ३०, ३१ जुलै होणार आहेत.

प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षकांची नेमणूक केली आहे. हे निरीक्षक मुलाखती घेऊन आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला देणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post