राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसच्या सोमवारी मुलाखती


वेब टीम : अहमदनगर
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने गुरुवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्या पाठोपाठ काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवार दि. २९ जुलै २०१९ रोजी चौथा मजला, कालिका प्राईड, पाठक हॉस्पिटल शेजारी, लालटाकी, अहमदनगर येथील युवक काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांची आघाडी होण्याबाबत विविध चर्चा व बैठक सुरु असून सदर जागा वाटपाचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच मतदारसंघ निश्चित होणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा स्तरावरील उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती. साळुंके यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना साळुंके म्हणाले, मुलाखतींसाठी प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक म्हणून पुणे येथील माजी आमदार मोहनदादा जोशी, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी बापू दहिते उपस्थित राहणार आहेत. तसेच सदर मुलाखतींसाठी प्रदेश काँग्रेस समितीच्या निर्देशानुसार निवड समिती तयार करण्यात आली असून सदर निवड समितीमध्ये प्रदेश काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आ. शरद रणपिसे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. डॉ. सुधीर तांबे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, माजी खासदार दादा पाटील शेळके, हेमंत ओगले, किरण पाटील, एन. एस. यु. आय. अध्यक्ष निखिल पापडेजा आदी मान्यवरांचा समावेश असून मुलाखत प्रक्रियेसाठी उपस्थित राहणार आहेत.

मुलाखतींसाठी अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील मतदारसंघासाठी सकाळी ११ ते १२.३० तर उत्तर जिल्ह्यातील मतदारसंघासाठी दुपारी १२.३० ची वेळ निश्चित करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे असे अवाहन करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post