आरोपींसह चोरीचा मोबाईल विकत घेणाराही जेरबंद


वेब टीम : अहमदनगर
वांबोरी घाटात चार दिवसांपूर्वी मेडिकल व्यावसायिकास लुटणाऱ्या त्या तीन आरोपींचे नावे निष्पन्न झाली असून चोरीचा मोबाईल विकत घेणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

पीआय दिलीप पवार हे पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने तपास करत असताना गोपनीय माहितीनुसार सदर गुन्हा कात्रड व मोरयाचिंचोरे येथील तिघांनी मिळून केला असून चोरलेला मोबाईल गुजाळे येथील प्रसाद बाबासाहेब चेंडवाल यास विकल्याची माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेण्यात आले असून सदर गुन्हा करणाऱ्यांची माहीती त्याने दिली. सदर त्या तिघा लुटारूचा पोलिसांकडून आता कसून शोध सुरू आहे. सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. दिवसेंदिवस वांबोरी-डोंगरगण घाटात लुटीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नगरकडून वांबोरीकडे जात असताना घटाच्या मध्यवर्ती भागात मेडिकल व्यावसायिक पंकज नाबरिया या वांबोरीतील तरुणास चोरट्यांनी मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लुटली. पाठीमागून एका दुचाकीवर तोंड बांधून आलेल्या इसमांनी पंकज यांच्या गाडीला गाडी आडवी लावून चावी काढली. दुसऱ्याने मारहाण केली. दरम्यान खिशातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व ६ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी काढून घेतला. दरम्यान चोरटे वांबोरीच्या दिशेने गेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध पंकज नाबरिया यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या घटनेपाठोपाठ काही तासाच्या अंतरावर वांबोरी- राहुरी रस्त्यावर खडांबे शिवारात अज्ञात चोरट्यांनी वांबोरीच्या दुसऱ्या एका तरुणाला लुटल्याची घटना घडली होती. ब्राह्मणी येथील सोनाराला घाटात लुटल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढल्याने परिसरात घबराट पसरली आहे. दोन पोलिस ठाण्याची हद्द असलेल्या या भागात एमआयडीसी व राहुरी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी जोरदार मागणी वांबोरी, कात्रड ब्राह्मणी, कुक्कडवेढे, खडांबे, उंबरे, मोरेवाडी, मोकळ ओहळ व चेडगाव आदी गावातुन होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post