नगरमध्ये टळली 'दारुकांड'ची पुनरावृत्ती


वेब टीम : अहमदनगर
संपूर्ण राज्यात गाजलेल्या पांगरमल विषारी दारूकांडची पुनरावृत्ती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सावधानतेने टळली  आहे.

पांगरमल विषारी दारू प्रकरणात तब्बल १० जणांचा बळी गेला तसेच अनेक निष्पाप कायमचे अपंग झाले. अनेक जन उघड्यावर आले, हे प्रकरण अजुन ताजे असतानाच पुन्हा नगरमध्ये बनावट दारुच्या कारखान्यावर छापा टाकून दोघांना अटक केली आहे.


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी दरम्यान पांगरमल दारुकांड घडले. हे प्रकरण राज्यभर गाजले. अनेकांचा बळी गेल्याने अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले. अनेक जणांना जेलची हवा खावी लागली. काही जण अद्यापही जेलमध्येच आहेत.
पांगरमल दारुकांड प्रकरण शांत होत नाही तोच नगरमध्ये केडगाव हनुमाननगर परिसरात पुन्हा बनावट दारु तयार करणार्‍या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अजून कसून चौकशी करत आहेत.
राज्य उत्पादन शुल्कचे पराग नवलकर तसेच सीपी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हिंदुस्तान डिस्टिलरीज च्या बाजूला नगर दौंड रोड वर यश मेंन्स पार्लर शेजारी हनुमान नगर केडगाव परिसरात बनावट मद्य तयार करणार्‍या कारखाना असल्याची गुप्त बातमी खात्रीदायक खबर्‍याकडून मिळताच दोन पंच व टीम सह जात घटणास्थळावर छापा मारला. या छाप्यात आरोपी कैलास
ओताडे, मनोज रायपिल्ली  या आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी ही बनावट दारू कशी बनवतात याचे प्रात्याक्षिकच यावेळी उत्पादन शुल्क विभागाला करून दाखवले. नामांकित विदेशी कंपन्यांची दारू, त्या दारूचा फ्लेवर, बाटलीचे पॅकिंग अगदी हुबेहूब करण्यात हे आरोपी माहिर आहेत. मात्र यात टाकण्यात येणारे रसायन भयाक आहे. त्यामुळे उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी केलेली ही कारवाई महत्वाची असून जिल्ह्यात पुन्हा एकदा पांगरमल दारुकांड ची पुनरावृत्ती टळली. ही कारवाई निरीक्षक ए.बी. बनकर, एस.ए.सराफ, कुसळे, दु. निरीक्षक सचिन वामने, सहा. फौजदार बी.बी.तांबट, गवांदे, कदम, बर्डे, वाघ यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post