धनंजय मुंडेंना 'होमपीच'वरच मोठा धक्का


वेब टीम : बीड
राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी तडकाफडकी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. देशमुख हे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.


देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना पाणी भेटावे यासाठी प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी गणेशपार येथे उपोषणही केले होते. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी कक्षासमोर आंदोलनही केले होते. त्यांनी खडका बंधाऱ्याच्या पाण्यासाठी शनिवारी पुन्हा उपोषण केले.

अखेर त्यांनी सोमवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सुपूर्द केला. शासनाकडून परळीकरांना पुरेसे पाणी भेटू शकत नसल्याचे कारण त्यांनी या राजीनाम्यात दिले आहे. राष्ट्रवादीतील राज्य पातळीवर होत असलेल्या राजीनाम्याचे लोन आता थेट परळीत आल्याची चर्चा नागरिकांत होत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post