काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पुण्याच्या तरुणाने केला अर्ज


वेब टीम : पुणे
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी थेट पुण्यातील एका तरुणाने अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा तरुण काँग्रेसचा साधा सदस्य अथवा कार्यकर्ताही नाही. गजानंद होसाळे असे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करणार्‍या तरुणाचे नाव आहे.

मुळचा लातुर जिल्ह्यातील उमरगा गाव असलेला होसाळे पुण्यातील एका अ‍ॅटोमोबाईल कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतो आहे.
लोकसभा निवडणूकीतील पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आपण आता काँग्रेसचे अध्यक्ष नसल्याचेही त्यांनी सोशल मिडीयावरुन स्पष्ट केले आहे.

त्यामुळे अध्यक्षपद रिक्त असून त्यासाठी वेगवेगळी नावे सातत्याने पुढे येत आहे. त्यासाठी आता थेट काँग्रेसचा सदस्य नसलेल्या होसाळे याने अर्ज दिला आहे. मी सदस्य नसलो तरी मी मतदार आहे. मला हीच मानसिकता बदलून पारदर्शकता आणायची असल्याने अध्यक्षपदासाठी अर्ज केला असल्याचे होसाळे यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post