राज्यातील 'या' सात खासदारांची खासदारकी आली धोक्यात


वेब टीम : औरंगाबाद
लाेकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. बहुतांश निवडणूक याचिकांमध्ये शपथपत्रात खाेटी माहिती दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नंदुरबार, बीड, नांदेड, परभणी, लातूर आदी मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदारांची खासदारकी धोक्यात आली आहे.

उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात खोटी, चुकीची व दिशाभूल करणारी माहिती नमूद केल्याप्रकरणात बीड लाेकसभा मतदारसंघाच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांच्या निवडीला सर्वप्रथम आव्हान देण्यात आले. या निवडणुकीतील पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी याचिका सादर केली आहे. 

निवडणूक आयोगाच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १२५-अ नुसार खोटी माहिती सादर करणे हा गुन्हा असून, त्या अंतर्गत ही याचिका सादर केली. 

दोन मतदार यादीत नाव असणे, आर्थिक व्यवहार लपवून ठेवणे, भावनिक मुद्याच्या आधारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वडील गोपीनाथ मुंडे यांचे नाव लावणे, वैद्यनाथ अर्बन को ऑप. बँकेच्या त्या संचालक असून त्यांच्या विरोधात बोगस कर्ज वाटप केल्याप्रकरणी परळीत फसवणुकीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. त्याचीही माहिती मुंडे यांनी सादर केली नसल्याचे आक्षेप घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post