राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक जाणार भाजपात?


वेब टीम : नवी मुंबई
काही महिन्यांपासून राज्यात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्यासाठी नेत्यांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं भाजपमध्ये जाण्याचं लोण आता महापालिकांमध्येदेखील पोहोचलं आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व 52 नगरसेवक हे राजीनामा देऊन भाजपमध्ये डेरेदाखल होणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता जाऊन शिवसेना भाजपची सत्ता अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं भाजपमध्ये होणारं पक्षांतर स्थानिक वाटत असलं, तरी यामागे विधानसभा निवडणुकीची गणितं असल्याची चर्चा सुरु आहे. संदीप नाईक हे भाजपच्या वाटेवर असून त्यांनी त्यांचे वडील गणेश नाईक यांनाही भाजपमध्ये येण्याचा आग्रह धरला आहे.
आज दुपारी संदीप नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी गणेश नाईक यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अनंत सुतारही उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post