शरद पवारांनी घेतला विधानसभेचा आढावा


वेब टीम : पुणे
आगामी विधानसभा निवडणुकांबाबत राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.


खासदार शरद पवार यांनी या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यभरातील मतदारसंघांचा आढावा घेतला.
यावेळी खासदार शरद पवार यांनी आलेल्या उमेदवारी अर्जांवर देखील चर्चा केली. मित्र पक्षांच्या अपेक्षा आणि मागण्यांबाबतही पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. येत्या काळात मित्रपक्षांशी चर्चा करून लवकरात लवकर जागावाटपाबाबतही तोडगा काढला जाईल, असा निर्णय बैठकीत झाला. विधानसभा निवडणुकीत कडवा लढा देऊन विजय संपादित करायचा सूर बैठकीत उमटला.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खा.सुनल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,, ज्येष्ठ नेते गणेश नाईक, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post