पीक विमा योजनेत सहभागासाठी २९ जुलैपर्यंत मुदतवाढ - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे


वेब टीम : मुंबई
खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी दि. 29 जुलैपर्यंत योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिली.

योजनेत सहभागी होण्यासाठी  बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज बँक व 'आपले सरकार सेवा केंद्र' (डिजिटल सेवा केंद्र) येथे स्वीकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळवण्यासाठी  विहित मुदतीपूर्वी नजीकची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.

याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post