स्वस्तिक चौकातील मसाज सेंटरवर छापा


वेब टीम : अहमदनगर
येथील नगर-पुणे महामार्गावरील स्वस्तिक चौक परिसरात असलेल्या एका मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. शुक्रवारी (दि.१९) पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ब्ल्यू डायमंड मसाज सेंटरवर छापा टाकून कारवाई केली.
अवैधरित्या सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची चर्चा होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी छापा टाकून कारवाई करण्यात आली. यात एका महिलेसह पुरुषाला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. पिटा अंतर्गत आरोपींवर कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post