नगरात भगतगल्लीत वेश्या व्यवसायावर छापा


वेब टीम : अहमदनगर
शहराच्या मध्यवस्तीतील गांधी मैदानावरील  भगतगल्ली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने बुधवार (दि.24) रात्री छापा टाकून तीन महिलांची सुटका केली.

वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे.
नगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या गांधी मैदानाजवळील असणा-या भगत गल्ली या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. 

त्यांनी खासगी वेशात आपल्या पथकातील पोलिसांना पाठवून माहिती घेतली.  शहनिशाकेल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला.

त्या ठिकाणी  महिला आढळून आल्या. त्यांची सुटका करत पोलिसांनी एका वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post