रोहित पवारांनी पुरविला सलूनवाल्याचा हट्ट...


वेब टीम : अहमदनगर
शरद पवार यांचे नातू रोहित पवार जामखेड मधून आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे. रोहित पवार यांनीही जामखेड विधानसभा मतदार संघात भेटीगाठींचा धडाका सुरु करुन मैदान तयार करायला सुरवात केलीय. अशाच एका दौर्‍यादरम्यान रोहित यांनी एका सलूनवाल्याच्या हट्टापायी थेट दर्ग्याशेजारी असणाऱ्या सलूनमध्ये केसांची कटींग करत
शेव्हिंग केली.

जामखेड येथील हजरत इमाम शहा वली दर्ग्यात रोहित पवार दर्शनासाठी गेलो होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर येत असताना जवळील ‘संदीप मेन्स पार्लर’ चे मालक संदिप यांनी रोहित पवारांसोबत फोटो काढण्याची इच्छा दाखवली. यावर रोहित यांनी त्याच्या सलून मध्ये जाऊन थेट शेव्हिंग करुन घेतली.

रोहित पवार यांचे सलूनमध्ये कटींग करतानाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेत. रोहित पवार यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट देखील टाकलीय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post