ठाकरेंच्या आदेशानंतर लगेच नालासफाई


वेब टीम : अहमदनगर
शहरातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याची तक्रार विद्यार्थिनींनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडे युवा संवाद कार्यक्रमात केली. यानंतर ठाकरे यांनी थेट महाविद्यालयात जाऊन परिसराची पाहणी केली. नाला व परिसर तातडीने दोन दिवसांमध्ये साफसफाई करून त्याचे फोटो पाठवा, अशी सूचना ठाकरे यांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना केली.


दरम्यान काही कालावधीच नालसफाईच्या कामास प्रारंभही झाला. यावेळी अशी कार्यवाही प्रत्येक विकास कामात झाली तर नगर शहर काही कालावधीत बदलून जाईल, अशी प्रतिक्रिया घटनास्थळ असणार्‍या नागरिकांनी व्यक्त केली.
 यावेळी ठाकरे यांच्यासोबत असणारे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी याबाबत तातडी कार्यवाही करावी, व साफसफाईचा अहवाल पाठवावा, असा आदेश दिला. यानंतर राधाबाई काळे महाविद्यालयात विद्यार्थींची भेट घेऊन त्यांच्या संवाद केला.
 यावेळी विद्यार्थ्यांनी बेरोजगार, उद्योग-व्यवसायबाबत थेट ठाकरे यांना सवाल केले. यावेळी नगरसेवक गाडे, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, आदींसह सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post