खडसेंसह भाजपातील नाराजांचा गट येणार काँग्रेसमध्ये : प्रदेशाध्यक्ष थोरातांचा दावा


वेब टीम : नाशिक
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते पक्षात नाराज आहेत. ते लवकरच आमच्या संपर्कात येतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.

काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दोन-अडीच महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार असून, लोकसभेनंतर ही निवडणूक महत्त्वाची आहे. कार्यकर्ते नाराज आहेत, ही वस्तुस्थिती असून, हीच नाराजी दूर करून निवडणुकीत यश मिळवायचे आहे. कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील, असा विश्वास आहे.

गटबाजी ही सगळ्याच पक्षांत असते. तशी ती काँग्रेसमध्येही आहे; पण वेळ आल्यावर काँग्रेसचे सगळेच कार्यकर्ते एकत्र येतात, त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी या आघाडीशी चर्चा सुरू असून, त्यांना त्यासंदर्भात नुकतेच पत्र पाठविण्यात आले आहे. राज ठाकरे यांची सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली असली, तरी या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. त्यांना सोबत घेण्याचा अजून तरी विचार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post