काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. थोरात, भाजप खासदार सुजय विखे एकाच विमानाने दिल्ली दरबारी


वेब टीम : शिर्डी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात आणि भाजपाचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी शिर्डी ते दिल्ली प्रवास योगायोगानेएकाच विमानाने केला.  त्यांच्या या प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सोमवारी सकाळी शिर्डी विमानतळावरून सकाळी साडेदहा वाजताच्या विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आ.थोरात यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. केंद्रीय नेत्यांशी त्यांची बैठक आहे. तसेच ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. तर खा.विखे आपल्या नियोजित कामांसाठी दिल्लीकडे रवाना झाले.

सोमवारी सकाळी दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला. विशेष म्हणजे प्रवास सुरू होण्याआधी दोघे शेजारीशेजारी बसलेले पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या. काहींनी त्यांचे छायाचित्र कैद करण्याचा प्रयत्न केला.

थोरात आणि विखे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडूकीत त्यांनी एकमेकांविरोधात आरोपांची राळ उडवली होती.

दोघांनी संपूर्ण प्रवास शेजारी बसूनच झाला की नाही? या प्रवासात दोघांत राजकीय चर्चा झाली की अन्य मुद्यांवर विचारांचे आदानप्रदान झाले, याची माहिती समजू शकली नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post