विखे पिता-पुत्रांनी घेतली अमित शहा यांची भेट


वेब टीम : दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांची गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डाॅ.सुजय विखे यांची सदीच्छा भेट घेवून नगर भेटीचे निमंत्रण दिले.

आज दिल्ली येथे या भेटी दरम्यान  गृहमंत्री अमित शहा यांचा श्री.साईबाबांची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावर आधारीत 'पायोनियर'या ग्रथांची प्रतही ना.विखे यांनी गृहमंत्री शहा यांना  दिली.माजी केद्रीय  मंत्री लोकनेते पद्मभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या समवेतील आठवणीना या भेटीत शहा यांनी आवर्जून  उजाळा दिला.

गृहमंत्री अमित शहा यांना अहदनगर येथे भेट देण्याची  विनंती ना.राधाकृष्ण विखे पाटील  यांनी केली.जनसेवा फौंडेशनच्या उपक्रमाचे  उद्घाटन करण्यासाठी  येण्याबाबतचे निमंत्रण मंत्री अमित शहांना खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी या भेटीच्या निमिताने दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post