जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून ३३ ठार


वेब टीम : जम्मू
जम्मू काश्मिरच्या किश्तवाडमध्ये एक बस दरीत कोसळून ३३ प्रवासी ठार झाले आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत.

केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. त्याच प्रवासादरम्यान ही बस दरीत कोसळली आणि ३३ जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

किश्तवाड येथील पोलीस उपायुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार या अपघातात ३३ प्रवाशांचा मृत्यू झाला. जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलंय. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन पोहचलं असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाल्याचं एएनआयने म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ही घटना कळल्यानंतर आपल्याला अतीव दुःख झाल्याचं म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post