म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष झालो नाही; गिरीश महाजनांची खंत


वेब टीम : जळगाव
भाजपामध्ये येण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची रांग लागलेली असते, मात्र आपण त्यांना परत पाठवतो असं जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

ते जळगावमध्ये आयोजित भाजपाच्या बैठकीत बोलत होते. तसंच भाजपा प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी आडनाव आड आल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.

'पहिले अभाविपमध्ये आलो, मग भाजप युवा मोर्चाचा गावाचा, तालुक्याचा जिल्ह्याचा अध्यक्ष झालो. राज्यामध्ये सरचिटणीस झालो. पण प्रमोद महाजनांचा नातेवाईक समजतील म्हणून तेव्हा मला अध्यक्षपद मिळालं नाही.

खूप आग्रह केला, पण तुमच्या नावात अडचण असल्याचं त्यांनी सांगितलं. महाजन-महाजन असं करता येणार नाही, म्हणून मला अध्यक्षपद मिळालं नाही', असं गिरीश महाजन म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post