कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला अखेर लाहोरमध्ये अटक


वेब टीम : लाहोर
कुख्यात दहशतवादी, मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यासह इतर अनेक हल्ल्यांचा मास्टर माइंड हाफिस सईदला पाकिस्तानातील लाहोर येथे अटक करण्यात आली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनुसार सईला टेटर फंडिंगच्या केसमध्ये अटक करण्यात आली आहे. भारताचा हा मोठा कूटनीतिक विजय म्हणावा लागेल

सईदला अटक करण्यासाठी भारतासह इतर अनेक अमेरिका आणि इतर देशांचा पाकिस्तानवर प्रंचड दबाव होता. पाकिस्तानी मिडीयानुसार सईदला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये 26/11 ला दहशतवादी हल्‍ला झाला होता. तपास यंत्रणांनी हल्‍ला करणार्‍यांपैकी एक कसाबला जिवंत पकडले होते.

त्याच्याकडे तपास केल्यानंतर हाफिस सईद हा पाकिस्तानात बसुन त्यांना सूचना देत असल्याचे कसाबने कबुल केले होते. न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. मात्र, मुंबईच्या हल्ल्यामध्ये हाफिस सईदचा सहभाग होता असे निष्पनन झाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post