नितेश राणेंना न्यायालयाकडून 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी


वेब टीम : सिंधुदुर्ग
उपअभियंत्यांच्या अंगावर चिखल फेकणं आमदार नितेश राणे यांना चांगलंच महागात पडले आहे. नितेश यांना पोलिसांनी आज कणकवली न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यासह एकूण 18 जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी मुंबई-गोवा महामार्ग उपअभियंत्यांच्या अंगावर चिखल ओतला होता. त्यानंतर रात्री नितेश आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले.

आज (शुक्रवार) त्यांना कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post