काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार; पिचड, शिवेंद्रराजे भोसले,नाईक, चित्रा वाघ भाजपात


वेब टीम : मुंबई
राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीचे आ. वैभव पिचड, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. संदीप नाईक यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केला आहे.


त्यांच्या प्रवेशाने काँग्रेस - राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांतदादा पाटील, ना.  सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख सर्वानी प्रवेश केला.

माजी मंत्री व शरद पवारांचे विश्वासू मधुकरराव पिचड यांनीही मुलगा वैभव पिचड सोबत भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. या सर्वांच्या प्रवेशाने भाजपाला निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post