2965 शेतकर्यांची लकी ड्रॉ पद्धतीने सोडत


वेब टीम : अहमदनगर
‘उन्नत शेती - समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत यांत्रिकीकरण घटकाचा ट्रॅक्टर व शेती अवजारासाठी नगर तालुक्यातील शेतकर्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. 1605 ट्रॅक्टरसाठी व 1300 अवजारांसाठी असे एकूण शेतकर्यांचे 2965 अर्ज तालुका कृषी कार्यालयास प्राप्त झाले आहे.

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत अ.नगर कृषी कार्यालय येथे यांत्रिकीकरण घटकाचा सोडत पद्धतीने प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, तंत्र अधिकारी रवींद्र माळी, मंडळ कृषी अधिकारी नारायण करांडे, सूर्यकांत शेकडे, सचिन भोसले, अमिन पठाण, संजय मेहेत्रे, राहुल गांगुर्डे, उमेश शेळके, बाळासाहेब काकडे, रमेश गोसावी, आशुतोष ढुमणे, गणेश पाचपुते, बाळासाहेब भोसले, प्रतिभा ढवळे, प्राणंदा ठोंबरे व शेतकरी उपस्थित होते.

श्री. विलास नलगे म्हणाले की, लकी ड्रॉमध्ये सोडत निघालेल्या शेतकर्यांचा ज्येष्ठता क्रम निश्चित करून कृषी विभागाची पूर्व संमती मिळाल्यानंतर शेतकर्यांना यंत्र अवजारे खरेदी करावीत. त्याची मोफत तपासणी करून त्याचे अनुदान थेट शेतकर्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे. शासकीय योजना आता सर्व ऑनलाईन झाल्या आहेत. शेतकर्यांनी आता काळानुसार बदलले पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे. शेतीत चढउतार हे चालूच असतात. 7 वर्षांत 5 वेळा दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. शेतकर्याने पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांचे नियोजन कारवे. ठिबक सिंचनाचा वापर करून गादी वाफा पद्धतीने वसरी ओरंबा पद्धतीने शेती करावी, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post