बाराव्या खेळाडूने प्रथमच केली कसोटीत फलंदाजी


वेब टीम : लंडन
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्‍या ऍशेस कसोटी सामन्यात प्रथमच 12 व्या खेळाडूला फलंदाजी करण्याची संधी मिळाली.

142 वर्षाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे.

या कसोटी सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात स्टिव्ह स्मिथच्या मानेवर जोफ्रा आर्चरने टाकलेला बाउन्सर आदळला.

चेंडू लागल्याने त्याला फलंदाजीसाठी मैदानात उतरता आले नाही. त्यामुळे स्मिथच्या जागी मार्नस लाबुशेनला फलंदाजीची संधी मिळाली.

लाबुशेनलाही आर्चरच्या तिखट बाउन्सरचा प्रसाद मिळाला. पण तरीही त्याने मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा घेत अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला हा सामना अनिर्णित राखण्यात यश आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post