छेडछाडीला विरोध : एकाच कुटुंबातील १६ जणांवर अ‍ॅसिड हल्ला


वेब टीम : पाटणा
बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील १६ व्यक्तींवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे.

छेडछाडीला विरोध केल्याने हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या पीडित कुटुंबातील युवतीची गावातील काही मुले सातत्याने छेड काढत होती.

त्यामुळे या युवतीच्या घरच्यांनी या मुलांना असे न करण्याची विनंती केल्यानंतर युवतीच्या कुटुंंबीयांवर या मुलांनी अ‍ॅसिड हल्ला केला.

बुधवारी सकाळी काही लोकांनी पीडितेच्या घरात घुसून कुटुंबातील लोकांवर अ‍ॅसिड फेकेले. यात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

तसेच यामध्ये दोन महिलांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post