शिवसेना उपनेते अनिल राठोड तोफखाना पोलिस ठाण्यात हजर


वेब टीम : अहमदनगर
शहर अभियंत्यांवर शिवसैनिकाने बूट फेकल्याप्रकरणी गुन्ह्यात आरोपी असलेले शिवसेना उपनेते व माजी मंत्री अनिल राठोड तोफखाना पोलिस ठाण्यात आज हजर झाले. त्यांच्या अटकेची कार्यवाही होऊन त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बोल्हेगाव रस्त्याचे रखडलेले काम सुरु करण्याच्या मागणीसाठी महापालिका आयुक्तांच्या दालनात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेच्या मदन आढाव याने शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट भिरकावला होता.

या प्रकरणी अभियंता सोनटक्के यांनी तोफखाना पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसेना नगरसेवक, कार्यकर्त्यांसह अनिल राठोड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणणे, अधिकार्‍यांना धमकावणे, शिविगाळ करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात गुरुवारी (दि.१) राठोड हे स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. त्यांच्या अटकेची कार्यवाही तोफखाना पोलिसांकडून सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post