कामाचे बिल काढण्यासाठी मागितले 40 हजार : इंजिनियर सापडला अँटिकरप्शनच्या जाळ्यात


वेब टीम : अहमदनगर
सरपंचाच्या पतीकडून जलयुक्त शिवार मधील कामाचे बिल काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाथर्डी पंचायत समितीच्या सिव्हिल इंजिनीअरला अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. पाथर्डीमध्ये ही कारवाई झाली असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.


लोकसेवक पंढरीनाथ उत्तमराव आव्हाड (वय ५३ वर्ष, स्थापत्य अभियंता, पंचायत समिती, पाथर्डी, जि. अ.नगर, रा.प्लॉट नं.१६, सावतानगर, शेवगाव रोड, ता. पाथर्डी) हे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदाराची पत्नी जांभळी ता.पाथर्डी गावच्या सरपंच आहेत. गावात जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेले कामाचे बिल काढण्यासाठी अभियंता पंढरीनाथ उत्तमराव आव्हाड याने ५०,०००/- रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून नगरच्या ‘एसीबी’च्या पथकाने सापळा रचला होता. ५० हजार रुपयांची लाच मागून चोरीनंतर ४० हजार रुपये गजानन टी हाऊस, नविन बस स्टॅन्ड जवळ, गर्जे कॉम्पलेक्स पाथर्डी येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सदर सापळा कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पो.हे.कॉ. तनवीर शेख, सतिष जोशी, पो.ना. प्रशांत जाधव, पो.ना. रमेश चौधरी, पो.ना.विजय गंगुल, चालक पो.हे.कॉ. अशोक रक्ताटे आदींच्या पथकाने केली.

शासकिय नोकर शासकिय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय, अहमदनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post