चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी


वेब टीम : दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयच्या पथकाने बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडींनंतर जोरबाग येथील निवासस्थानातून अटक केली.

सीबीआयच्या मुख्यालयात रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. चिदंबरम यांना आज (गुरूवारी) सीबीआयच्या न्यायालयासमोर हजर केले.

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांना जामीन नाकारला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.हा निर्णय सीबीआयच्या राउज एव्हेन्यू न्यायालयाने दिला. यावेळी न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त होता.

सीबाआयने चिदंबरम यांना साडे तीन वाजता न्यायालयात आणल्यानंतर तीन तास कसून चौकशी केली होती. यावेळी छोट्या कोर्ट रुममध्ये आणल्याबद्दल चिदंबरम यांनी आश्चर्य व्यक्त केले.

मला वाटलं मोठ्या न्यायालयात मला आणले जाईल, अशी मिश्किल टिप्पणी चिदंबरम यांनी केली. त्यानंतर सुनावणीस सुरुवात झाली.चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसल्याने त्यांच्या चौकशीसाठी त्यांना पाच दिवसाची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सीबीआयने न्यायालयाला केली.

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी चिदंबरम यांची चौकशी करायची असल्याचे ही सीबीआयने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चिदंबरम यांची २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post