चीनला दणका : खोटेपणाला फेसबुक, ट्विटरचा लगाम


वेब टीम : बीजिंग
रशियाप्रमाणे चीननेही आपल्या बाजूने वातावरणनिर्मितीसाठी आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी फेसबुकचा वापर करण्यास सुरूवात केली.

हाँगकाँगमध्ये चीनच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक आणि युद्धाप्रमाणे भासवण्याचा प्रयत्न चीनने फेसबुक आणि ट्विटरवरून सुरू केला होता.

फेसबुक आणि ट्विटरने याचे स्पष्टीकरण देणारे एक निवेदन मंगळवारी जारी केले. दोन्ही सोशल मीडिया कंपन्यांच्या मते,चीनशी संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे हाँगकाँगमधील प्रदर्शनाला हिंसक दाखवले जाण्याचा प्रयत्न होत आहे. फेसबुक आणि ट्विटरने हे अकाउंट बंद केले आहेत.

३ फेसबुक ग्रुप, ७ फेसबुक पेज आणि ५ खाती हाँगकाँग आंदोलनाची खोटी माहिती दिल्याने बंद केली आहेत.

ट्विटरनेदेखील अशी ९३६ खाती बंद केली आहेत. ही खाती चीनशी संबंधित असल्याची माहिती फेसबुक आणि ट्विटरला आयपी ऍड्रेसमुळे समजली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post