हॉटेल व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न; छोटा राजन दोषी


वेब टीम : मुंबई
विशेष न्यायालयाने हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी कुख्यात राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह सहा जणांना दोषी ठरवले.

हा निर्णय छोटा राजनविरोधात सध्या सुरू असलेल्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने दिला.

गुन्हेगारी षडयंत्र रचणे, हत्या, हत्येचा प्रयत्न व २०१२ मध्ये हॉटेल व्यावसायिक बी.आर शेट्टी यांच्यावर गोळीबार केल्या प्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवले गेले.

या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने १३३२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. हॉटेल व्यावसायिक बी.आर शेट्टी यांच्यावर २०१२ मध्ये गोळीबार झाला होता. दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या व हल्लेखोर फरार झाले होते.

तर शेट्टी यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र तरीही त्यांनी जवळील पोलीस ठाणे गाठले व त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले होते.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जानेवारी २०१३ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात छोटा राजनच्या सुचनेवरूनच शेट्टींना गोळी मारल्याची माहिती समोर आली होती. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post