काँग्रेस घेणार प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर


वेब टीम : अहमदनगर
आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुके व अहमदनगर शहर अशा एकूण १५ प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन दि. २२ ऑगस्ट २०१९ ते ०२ सप्टेंबर २०१९ या कालावधीत करण्यात आले असून सदर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी केले आहे.

     कॉंग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर बाबत बोलतांना श्री.साळुंके पुढे म्हणाले सदर एक दिवसाचे शिबीरामध्ये तालुक्यातील तालुका कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, सेवा दल, महिला कॉंग्रेस, विद्यार्थी कॉंग्रेसच्या तालुका पातळीवरील सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले असून सदर शिबिरांतर्गत कॉंग्रेसची विचारधारा, निवडणूक व्यवस्थापन व युती सरकारची पोलखोल करणाऱ्या विविध विषयांवर प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे विविध व्याख्यात्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

   अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने
Ø  दि २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. जामखेड तर दुपारी ०२ वा. माही जळगाव,कर्जत
Ø  दि २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. भाळवणी,पारनेर तर दुपारी ०२ वा. नगर तालुका
Ø  दि २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. पाथर्डी तर दुपारी ०२ वा. शेवगांव
Ø  दि २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. राहुरी तर दुपारी ०२ वा. श्रीरामपूर
Ø  दि २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. श्रीगोंदा तर दुपारी ०२ वा. अहमदनगर शहर
Ø  दि ०१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. अकोले तर दुपारी ०२ वा. संगमनेर
Ø  दि ०२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. राहाता तर दुपारी ०२ वा. कोपरगांव
येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सदर प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव डॉ.वामशीचंद रेड्डी, विधान परिषद सदस्य आ.डॉ.सुधीर तांबे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रशिक्षक योगेंद्र पाटील, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दादासाहेब मुंढे, प्रा.हिरालाल पगडाल सर आदी मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post