भांडणातून भावाला घरासह पेटवून दिलं, दाम्पत्य गंभीर जखमी


वेब टीम : अहमदनगर
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे किरकोळ  भांडणातून स्वतः च्या भावाला घरासह पेटवून दिले. या आगीत दाम्पत्य जखमी झाले आहे. बुधवार (दि.२८) सकाळी ही घटना घडली.

गोरख भदे, त्यांंची पत्नी सुरेखा भदे ही दोघे जखमी झाले आहेत.  दोघांवर  नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, गाेरख भदे यांचे शरद भदे याच्यासोबत भांडण झाले होते. त्या भांडणातून गोरख यांच्या घराला बाहेरून कडी लावून शरद भदे याने घराचे छप्पर दिले पेटवून दिले.

आगीचा भडका उडताच ग्रामस्थांनी दाम्पत्याला बाहेर काढले. आगीत होरपळून दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post