वेब टीम : दिल्ली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना राजस्तान येथील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असतील. राजस्तान येथे ह...
वेब टीम : दिल्ली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना राजस्तान येथील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असतील. राजस्तान येथे होत असलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली डॉ. मनमोहन सिंग यांना उमेदवारी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सिंग त्यांचा अर्ज १३ ऑगस्ट रोजी सादर करण्याची शक्यता आहे.
डॉ. मनमोहनसिंग हे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यसभेत पोहचण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पंतप्रधान असताना ते आसाममधून राज्यसभा सदस्य होते.त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ १४ जून रोजी पूर्ण झाला होता.
त्यामुळे, राज्यसभेत परत जाण्यासाठी काँग्रेसने त्यांना राजस्तानमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले मदन लाल सैनी यांच्या निधनानंतर येथील जागा रिक्त आहे. येथील जागेसाठी २६ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असून मतदानानंतर संध्याकाळी विजयी उमेदवाराची घोषणा होईल.