आदिवासी भागात आता 'इको पर्यटन'


वेब टीम : मुंबई
आदिवासी समाज हा वनक्षेत्रात राहणारा पर्यावरणप्रेमी समाज आहे. या समाजाला पर्यावरणाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची माहिती असल्यामुळे 'इको पर्यटन' या संकल्पनेला चालना देऊन आदिवासी समाजातील युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.

डॉ. फुके यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आदिवासी विकास विभागाला मागील पाच वर्षात केंद्रीय योजनांमधून प्राप्त निधी व खर्चाचा तपशील, प्राप्त निधीमधून सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम, उपक्रमांतर्गत करण्यात आलेले सामंजस्य करार व अंमलबजावणी विषयक मध्यस्थी जाणून घेण्यासाठी बैठक झाली.

डॉ. फुके म्हणाले, आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. आदिवासी समाजातील युवकांसाठी विविध क्षेत्रात नवीन रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात वाहन चालक क्षेत्रात मागणी असल्याने ड्रायव्हिंग प्रशिक्षण सारखे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच आदिवासी समाजातील कलाकृतींच्या विक्रीसाठी व्यापकस्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

या बैठकीस आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, आदिवासी विकास महामंडळाचे आयुक्त किरण कुलकर्णी, आदिवासी विकास विभागाचे व्यवस्थापकीय संचालक नि. का. पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post