भारताचा एसो एल्बेन विश्व अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल


वेब टीम : दिल्ली
एसो एल्बेन या भारतीय खेळाडूने सलग दुसर्‍या वर्षी भारताला विश्व अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धेत पदक जिंकून दिले आहे. अंदमान-निकोबारचा हा खेळाडू सायकलिंगच्या ज्युनियर गटाच्या क्रमवारीत जगात नंबर वन आहे.

गेल्या वर्षी 16 ऑगस्टला त्याने भारताला सायकलिंगमधले पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकून दिले होते. त्यावेळी स्वीत्झर्लंडमधील ऐगल येथे किरीन स्पर्धा प्रकारात तो रौप्य पदक विजेता ठरला होता.

आणि आता यंदा 15 ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिनी जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे सायकलींगच्या याच प्रकारात त्याने विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे कास्यपदक जिंकले आहे.

अवघ्या 17 आणि 18 वर्षे वयात त्याने हे यश मिळवले आहे. गेल्यावेळच्या रौप्यपदकाने त्याला स्प्रिंट सायकलिंगच्या ज्युनियर गटात नंबर वन बनवले होते.

हे नंबर वन स्थान त्याने टिकवून ठेवलेले आहे. हे सर्वोच्च स्थान गाठणारा तो पहिलाच भारतीय सायकलिंगपटू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates