माजी आ. गडाख घेणार शिवधनुष्य हाती?


वेब टीम DNALive24.com: अहमदनगर
विधानसभा निवडणूक जवळ आली असतांना राज्यात भाजप - शिवसेना स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांचा माजी आ. शंकरराव गडाख यांनी त्यांच्या 'आमराई'त पाहुणचार केला. त्यामुळे गडाख आता शिवधनुष्य हाती घेणार  अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

HTTPS://mr.dnalive24.com

गेल्या विधानसभेला राष्ट्रवादीकडून उभे राहून पराभवाचा सामना करावा लागल्याने गडाखांनी जिल्हा परिषद निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नावावर बाजी मारली. तेव्हापासूनच गडाखांचा भाजप प्रवेशाची चर्चा होत आहे. नुकतेच युवा नेते प्रशांत गडाख यांनी मुंबईत भाजपच्या काही बड्या नेत्यांच्याही गाठीभेटी घेतल्याची चर्चा होती.

HTTPS://mr.dnalive24.com

त्यामुळे गडाख भाजप जाणार असल्याचे चर्चा उठल्या होत्या. मात्र भाजपकडून विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यास नकार मिळत असल्याने आ. बाळासाहेब मुरकुटे यांचे भाजप तिकीट निश्चित मानले जात आहे. तसेच राज्यभरात ऐनवेळी भाजप - शिवसेना वेगवेगळे लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेनेही तयारी सुरू केली आहे.

HTTPS://mr.dnalive24.com

त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय असलेल्या नार्वेकर यांनी शनिवारी सोनईत गडाखांची भेट घेतली. या नेत्याने तत्पूर्वी शनिशिंगणापूर ला जात शनी दर्शनही घेतले. त्यावेळीही गडाख त्यांच्याबरोबर असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे युती झाली नाही तर शिवसेनेकडून आणि युती झाली तर भाजपची जागा शिवसेनेला घेऊन गडाख शिवसेनेकडून निवडणूक लढवू शकतात.

HTTPS://mr.dnalive24.com

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post