आधार केंद्रावर वापरत होते 'गमी फिंगर'; तहसीलदारांनी धरले अन्...


वेब टीम : अहमदनगर
सावेडीत गमी फिंगरचा वापरणाऱ्या आधार केंद्र चालकांवर नगर तहसीलकडून  कारवाई करण्यात आली आहे. गमी फिंगर जप्त करण्यात आले. त्या आधार केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिले तहसीलदार उमेश पाटील यांनी दिले.

सावेडीतील राज एंटरप्राइजेस सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलातील आधार केंद्रावर ही कारवाई झाली. येथून गमी फिंगरची किट जप्त करण्यात आली आहे. जहीर उद्दीन सर्फुद्दिन शेख यांच्या नावे रजिस्टर्ड आहे.

त्याचप्रमाणे सावेडी येथील इरफान गोल्डन टच या महा ई-सेवा केंद्रावर सुद्धा कारवाई करण्यात आली. तोफखाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.

निवासी नायब तहसीलदार बारवकर रावसाहेब, सावेडी मंडलाधिकारी दशा भाऊसाहेब, तलाठी देशपांडे भाऊसाहेब हे कारवाईत सहभागी झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post