पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार; भारतीय जवान हुतात्मा


वेब टीम : पुंछ
राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर आज सकाळी पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला.

यात एक भारतीय जवान हुतात्मा झाला. गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानकडून गेले काही दिवस वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर तुफान गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला.

गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत जवान लान्स नायक संदीप थापा (वय ३५) हुतात्मा झाले. थापा हे देहरादूनचे असून, १५ वर्षांपासून ते लष्करी सेवेत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post