जमीनीच्या वादातून तिघांकडून एकास दगडाने जबर मारहाण


वेब टीम : अहमदनगर
जमिनीच्या वादाचा मनात राग धरुन तिघांनी एकास दगडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना नगर तालुक्यातील देवगाव येथे मंगळवारी (दि.27) सकाळी 11 वाजता घडली.

नगर तालुक्यातील देवगाव या गावातील वामन कुटुंबात जमिनीवरुन वाद होता. त्या वादाच्या कारणावरुन पोपट गोपिनाथ वामन, गोपिनाथ भागुजी वामन, सिताबाई गोपिनाथ वामन (तिघे रा.देवगाव, ता.नगर) यांनी दत्तात्रय देवचंद वामन (वय. 32, रा. देवगाव) यास रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत दगडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीदरम्यान दत्तात्रय याच्या खिशातील रोख रक्कम 5 हजार व दागिने गहाण ठेवल्याच्या पावत्या गहाळ झाल्या.

याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी दत्तात्रय वामन याच्या फिर्यादीवरुन भादविक 324, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post